लोणीकरांच्या मतदार संघात शेतकरी सरकारी लाभांपासून वंचित, शेतकऱ्यांचे सात दिवसांपासून उपोषण सुरु

Foto

परतूर- येथील शेतकरी गेली सात दिवसापासून तहसील कार्यालयासमोर सरसकट कर्जमाफी, सिंचन विहिरीचे बिले, मनरेगा अंतर्गत कामे उपलब्ध करणे अशा अनेक मागण्यांसाठी उपोषणाला बसले होते मात्र त्यांच्या उपोषणाला कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी आज पंचायत समिती कार्यालय परतूर येथे बैलं बांधून अनोखे आंदोलन सुरु केले आहे.

 

परतूर तालुक्यातील शेतकरी मागील सात दिवसांपासून तहसील कार्यालयासमोर सरसकट कर्जमाफी, सिंचन विहिरीचे बिले, मनरेगा अंतर्गत कामे उपलब्ध करावेत अशा अनेक मागण्यांसाठी उपोषणाला बसले होते मात्र या उपोषणाला कुठलाही प्रतिसाद शासन अथवा प्रशासनाकडून मिळत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी परतूर येथील पंचायत समिती कार्यालयात बैलं बांधून अनोखे आंदोलन सुरु केले असून आंदोलनाला राजेश विटकर यांनी भेट देऊन विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांच्याशी फोनवरून यासंबंधी तोडगा काढण्याबाबत चर्चा केली आहे. तसेच उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील यांच्या समोर शेतकऱ्यांचे प्रश्न मांडून शासन स्तरावर याप्रश्नी लवकर तोडगा काढावा असे निवेदन दिले आहे.

 

पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकरांचा आहे परतूर मतदारसंघ

 

राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर हे मुख्यमंत्र्यांच्या अगदी जवळचे मंत्री म्हणून ओळखल्या जातात मात्र त्यांच्याच मतदार संघात शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीशी झुंज देताना लोणीकर यांचे शेतकऱ्यांच्या प्रश्नी दुर्लक्ष झाले असल्याचे शेतकऱ्यांकडून बोलल्या जात आहे. अद्यापपर्यंत तालुक्यात मनरेगाची कामे सुरु करायला हवी होती मात्र मंत्री महोदयांनी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष तर केले नाही ना असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केल्या जात आहे

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker